Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

गतिमंद मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून पित्याची आत्महत्या

गतिमंद मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून पित्याची आत्महत्या

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये गतिमंद मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने नैराश्यातून पित्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. हदगाव तालुक्यातील आष्टी येथील ही दुर्दैवी घटना आहे. दिपक पुंजाराम खंदारे असे विषप्राशन करुन आत्महत्या (Suicide) केलेल्या पित्‍याचे नाव आहे. (nanded news Father commits suicide due to lack of money for medical treatment)

हदगाव येथील दीपक खंदारे यांना (Nanded) दोन मुली आहेत. एक मुलगी गतिमंद आहे. तर एका मुलीचे दोन महिन्‍यांपुर्वीच कर्ज काढून लग्न (Marriage) केले. गतिमंद मुलीवर अनेक वर्षापासून उपचार सुरू आहेत. त्याचा फारसा काही फरक पडत नसल्याने आणि जवळचे पैसे संपल्याने. आता उपचारासाठी कुठून पैसे आणायचे म्हणून दिपकने शेतात जाऊन विषप्राशन करुन आत्महत्या केली.

आता पत्‍नीपुढे मोठा प्रश्‍न

कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नी रेखा यांच्‍यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच गतिमंद मुलीवर उपचार कसे करावे? असा प्रश्न तिला पडलाय. त्यामुळे रेखाने मदतीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT