Shaktipeeth Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक; नांदेडमध्ये आदेशाची होळी, सांगलीत महामार्गाची मोजणी रोखली

Nanded Sangli News : नागपूर ते गोवा असा हा महामार्ग होणार असून महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. महामार्गासाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार नाहीत. परंतु शासन शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यावर ठाम

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी/ विजय पाटील 
नांदेड/ सांगली
: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली आहे. तर या महामार्गाची २० हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. महामार्गाला विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले असून नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली. तर सांगलीत महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली आहे. 

नागपूर ते गोवा असा हा महामार्ग होणार असून या महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत. परंतु शासन शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. तर शेतकरी मात्र आपल्या जमिनी या महामार्गास देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून शेतकरी आणि शासन यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाविरोधात बोंब मारो आंदोलन 

नांदेडच्या मालेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली. शासन आदेशाची होळी करत शासनाविरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केले. या आंदोलनात नांदेड, परभणी, हिंगोली येथील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून काही मोजक्याच लोकांच्या हितासाठी हा मार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात येतोय. या महामार्गात हजारो कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ हा मार्ग होऊ देणार नसल्याचे भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धरले रोखून

सांगली : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांनी रोखून धरले आहे. संतप्त शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही; अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळ पासून थांबून राहावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

SCROLL FOR NEXT