Nanded Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident News : देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या गाडीला अपघात; ३ महिला गंभीर जखमी

देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या जीपला अपघात; ३ महिला गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्या माहुर येथे देवदर्शनासाठी येत असलेल्या तेलंगणाच्या भाविकांच्या (Nanded) जीपचा अपघात झाला. या अपघातात (Accident) १३ प्रवाशी जखमी झाले असून ३ महिला गंभीर जखमी आहेत. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. (Maharashtra News)

नांदेड जिल्ह्यातील माहुर येथे देवदर्शनासाठी येत असताना त्यांच्या या जीपला अपघात झाला. किनवट तालुक्यातील सारखाणी घाटात या जीपचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघात जीपमधील १३ भविकांपैकी ३ महीला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर इतर १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्व तेलंगणा राज्यातील भाविक होते.

सर्व जखमी रूग्‍णालयात दाखल

अपघात झाल्‍यानंतर आजूबाजूच्‍या नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर जखमींना तातडीने किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बकरी ईदच्या दिवशी पुसद ग्रामीण पोलिसांची अवैध शस्त्राविरोधात कारवाई

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाच्या गळ्यात रश्मिकाच्या नावाचे पेंडन्ट; चाहते म्हणाले, मॉर्डन मंगळसूत्र

Reel Star Death: प्रसिद्ध महिला रिलस्टारची हॉटेलमध्ये आत्महत्या, तपासातून धक्कादायक कारण आलं समोर

शाळेच्या हॉस्टेलला भीषण आग; १६ विद्यार्थिनींचा होरपळून मृत्यू , अनेकांची मदतीसाठी धावाधाव

'कल्याणच्या चुलबुली'चा बोल्ड अंदाज! शिवाली परबचा सिल्वर वनपीसमधील फोटो केले शेअर

SCROLL FOR NEXT