Nandurbar Railway Station : नंदुरबार स्थानकाला अमृत भारत रेल्वे स्थानकाचा दर्जा; चेहरामोहरा बदलणार

नंदुरबार स्थानकाला अमृत भारत रेल्वे स्थानकाचा दर्जा; चेहरामोहरा बदलणार
Nandurbar Railway Station
Nandurbar Railway StationSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : पश्चिम रेल्वेच्या स्थानकात नंदुरबार स्थानक महत्त्वाचे आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने नंदुरबार (Nandurbar) रेल्वे स्थानकाला अमृत भारत रेल्वे स्थानकाचा दर्जा देण्यात आला आहे. या अंतर्गत रेल्वे (Railway) बोर्डाकडून स्थानकाचा चेहरामोहरा बदलविण्यात येणार आहे. (Live Marathi News)

Nandurbar Railway Station
Beed Street Dog Attack: बीड शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत; एकाच दिवसात १३ जणांवर जीवघेणा हल्ला

केंद्र सरकारने रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून देशातील लहान परंतु वाहतुकीच्या दृष्टीने मध्यवर्ती उंचविण्यासाठी अमृत भारत रेल्वेस्थानक (Railway Station) ही योजना सुरू केली आहे. यात पश्चिम रेल्वेअंतर्गत दोन स्थानकांचा समावेश करण्यात आला असून, त्यात नंदुरबार व पालघर स्थानकांचा समावेश आहे. या अंतर्गत विविध विकास कामांसह आधुनिक असलेल्या रेल्वेस्थानकांचा दर्जा मिळणार आहे.

Nandurbar Railway Station
Parbhani News : बैलांना चारा टाकायच्‍या नावाने गेला तो परतलाच नाही; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

प्रवाशांना मिळणारा आधुनिक सुविधा

गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नंदुरबारची ओळख आहे. या स्थानकावरून संपूर्ण देशात जाण्यासाठी रेल्वे गाड्या आहेत. त्यामुळे या स्थानकावरील प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळायला हवी, यासाठी रेल्वे प्रशासनाने अमृत भारत योजनेत समावेश केल्याने प्रवाशांसाठी चांगल्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com