Swabhimani Shetkari Sanghatna Saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatna : दिवाळी सणात चटणी भाकर आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Nanded News : पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टर हुन अधिक शेती पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळावी; यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दिवाळी सणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

नांदेडसह राज्यभरात यंदा पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टर हुन अधिक शेती पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून सरकारने निधी जाहीर केला आहे. मात्र हि मदत तुटपुंजी मानली जात आहे.

चटणी भाकरी आंदोलन 

राज्य सरकारने अत्यंत तोकडी मदत सरकारने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावे. तसेच संपूर्ण कर्जमाफी करावी, पिक विमा द्यावा व शेती मालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन केल आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी ३१४ कोटी अनुदान प्राप्त 

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तीन लाख ३८ हजार शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१४ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेली होती. तेवढी मदत जिल्हा प्रशासनाला शासनाकडून प्राप्त झालेली आहे. आता तालुकानिहाय नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

SCROLL FOR NEXT