Banjara Community Saam tv
महाराष्ट्र

Banjara Community : आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

Nanded News : एसटी प्रवर्गाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. येणाऱ्या १७ सप्टेंबरपर्यंत बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजाने दिला

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढला. हैदराबाद गॅजेट नुसार हा जीआर काढण्यात आल्याने बंजारा समाज देखील आता आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून असल्याचा दावा बंजारा समाजाने केला असून एसटी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी बंजारा समाजाकडून केली जात आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चा काढत निवेदन देण्यात आले. 

महाराष्ट्रात देखील हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. नांदेडच्या भोकर येथे बंजारा समाजाने एसटी प्रवर्गाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. येणाऱ्या १७ सप्टेंबरपर्यंत बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजाने दिला आहे. या मोर्चात बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बंजारा समाजाचे हिंगोलीत आंदोलन

हिंगोली : सरकारच्या हैदराबाद गॅजेटच्या शासन निर्णयानुसार बंजारा समाज एसटी प्रवर्गात समाविष्ट होणार असल्याचे सांगत हिंगोलीत बंजारा समाजाने मोठे आंदोलन उभे केले आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया पुढे गौरसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात बंजारा समाजातील महिलांनी पारंपारिक वेशभूषेत दाखल होत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तातडीने एसटी प्रवर्गात समावेश करा, अन्यथा सरकारच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे. 

संभाजीनगरात उद्या रास्ता रोको 

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद गॅझेटिअर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी लागू करावा; अशी मागणी करीत बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन हाती घेण्यात आले. उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने तातडीने बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी लागू केला नाही; तर प्रखरपणे राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

धाराशिवमध्येही आक्रमक भूमिका 

धाराशिव : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर बंजारा समाजानेही ऐतिहासिक दाखले देत आरक्षणासाठी ठाम मागणी केली आहे. निजाम काळातील हैद्राबाद गॅझेट (सन 1881 ते 1918 तसेच 1941 च्या जनगणना) मधील उल्लेखानुसार बंजारा समाज हा आदिवासी घटक असून, महाराष्ट्रात त्यांचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा; अशी मागणी करण्यात आली. तर मागणी मान्य नाही झाली तर या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांची ही भेट घेणार असून आमच्या प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवा अशी विनंती करणार असल्याचे बंजारा आंदोलक सांगत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या दिवशी करा 'हे' हळदीचे खास उपाय

IndW vs SAW Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वर्ल्डकप फायनल लाइव्ह कुठे बघाल फ्री? वाचा

Gauri Kulkarni: गोऱ्या गोऱ्या रंगाची 'ही' अभिनेत्री कोण?

Maharashtra Live News Update : मनमाड परिसरात जोरदार पावसाची हजेरी

Thane To Amravati: ठाणेहून अमरावतीला कसे पोहोचाल? 'या' मार्गांचा वापर करून करा आरामदायी प्रवास

SCROLL FOR NEXT