Ashok Chavan Saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan News: नांदेड– जालना मार्ग सिमेंटचा न झाल्यास आंदोलन; अशोक चव्हाण यांचा इशारा

नांदेड– जालना मार्ग सिमेंटचा न झाल्यास आंदोलन; अशोक चव्हाण यांचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : समृद्धी महामार्गाला जोडणारा नांदेड– जालना मार्ग सिमेंट काँक्रिटचा व्‍हायला हवा. कॉंक्रीटीकरण (Nanded) झाले नाही, तर आंदोलन करणार, काम बंद करणार; असा इशारा काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांनी दिला. (Live Marathi News)

सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अशोक चव्हाणांनी (Samruddhi Highway) समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड– जालना महामार्गाला मंजुरी दिली होती. पण एमएसआरडीसीने हा मार्ग सिमेंट काँक्रिटऐवजी डांबर रस्ता करण्यास मंजुरी दिली. माराठवड्यात डांबरी रस्ते जास्त काळ टिकत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा न करून मराठवाड्यावर अन्याय का? असा सवाल अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.

मराठवाड्यातील जमीन सिमेंट काँक्रिटसाठी अनुकूल नाही; असा निष्कर्ष एमएसआरडीसीने काढला आहे. मग दुसरीकडची जमीन डांबरी रस्त्यासाठी चांगली असेल तर तिकडे डांबरी रस्ते करा. राष्ट्रीय महामार्ग मराठवाड्यात सिमेंट काँक्रिटचे झालेत मग यावेळी असा निकष का असा सवाल चव्हाणांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT