Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: आरोपीने न्यायाधीशावर भिरकावली चप्पल; सहा महिने कैदेची शिक्षा सुनावल्‍यानंतरचा धक्‍कादायक प्रकार

आरोपीने न्यायाधीशावर भिरकावली चप्पल; सहा महिने कैदेची शिक्षा सुनावल्‍यानंतरचा धक्‍कादायक प्रकार

संतोष जोशी

नांदेड : दरोड्याच्‍या गुन्‍ह्यात अटक आरोपीला आज नांदेडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर सहा महिन्‍यांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा झाल्‍याचे एकल्‍यावर दरोड्यातील आरोपीने जिल्हा सत्र न्यायाधीशावर चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना घडली. (Breaking Marathi News)

दरोड्याच्या गुन्ह्यात (Crime News) अटक असलेला दत्ता हरी हंबर्डे यास आज नांदेडचे जिल्हा सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या न्‍यायालयात हजर केले होते. 2020 मधील दरोड्यातील इतर आरोपींना जामीन मंजुर झाला. मात्र आपला जामीन होत नसल्याचा राग मनात धरुन दत्ता हंबर्डे याने न्यायधिशावर चप्पल फेकली.

सहा महिने कैद व एक हजार रुपयांचा दंड

आरोपी दत्ता हंबर्डे याने चप्पल न्यायधिशाच्या दिशेने भिरकावलेली चप्पल न्यायधिशाच्या समोर लावलेल्या काचांवर आदळली. दरम्यान या घटनेची न्यायधीश शशिकांत बांगर यांनी गंभीर दखल घेत चप्पल फेकल्याच्या कारणावरुन आरोपी हंबर्डे याला तातडीने सहा महिने कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT