Shirdi Saibaba Sansthan Donation: साई चरणी एकाच दिवसात सव्‍वा कोटी रुपयांचे दान

साई चरणी एकाच दिवसात सव्‍वा कोटी रुपयांचे दान
Shirdi Sai Baba
Shirdi Sai BabaSaam tv

सचिन बनसोडे

शिर्डी : शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या चरणी दान देणाऱ्या भक्‍तांची संख्‍या कमी नाही. अशाच भक्‍तांकडून आजच्‍या एकाच दिवशी १ कोटी २७ लाख रूपयांची दान आले आहे. (Maharashtra News)

Shirdi Sai Baba
Accident News: वडिलांच्‍या कारखालीच सापडला चिमुकला; पार्किंगमधून कार काढताना थरारक घटना, आईचा आक्रोश

साईबाबांच्या चरणी दानाचा ओघ सुरूच असून हैद्राबाद येथील साईभक्त राजेश्‍वर यांनी साईबाबा संस्‍थानला मेडीकल फंडकरीता रुपये २५ लाख रुपयांचे चार डिमांड ड्राफ्ट अशी १ कोटी रुपये देणगी दिली. या देणगीचे (Shirdi) डिमांड ड्राफ्ट संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍याकडे सुपुर्त करण्यात आलेत.

२७ लाखाची सोन्‍याची निरंजनी

तर चेन्‍नई येथील देणगीदार साईभक्‍त व्‍ही. जितेंद्र यांनी ५४४ ग्रॅम वजनाची २७ लाख ७७ हजार रुपये किंमतीची आरतीसाठी वापरातील सोन्‍याची निरंजन साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिली. अशा प्रकारे साई संस्थानला एकाच दिवसात जवळपास १ कोटी २७ लाख ७७ रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com