Nanded Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकने उडविले; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्‍यू

प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकने उडविले; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्‍यू

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या (Accident) अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचा (Nanded News) आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. (Maharashtra News)

नांदेड ते मुदखेड या मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. यात नांदेडकडे प्रवाशांनी भरलेली ॲपरिक्षा जात होती. या वेळी नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्‍या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच (Accident Death) मृत्‍यू झाला. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्‍य ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मजुरीसाठी जात होते

रोजच्‍या नित्‍यनियमाप्रमाणे नांदेडला रिक्षाने अनेकजण मजुरीसाठी जात होते. यानुसार आज देखील ॲपेरिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. परंतु, कामावर पोहचण्यापुर्वीच रिक्षाला अपघात होवून काळाने घाला घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

NEETचं नियंत्रण थेट PMOकडे, पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचेही NTAच्या कारभारावर ताशेरे

Pune Police: पुणे विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई, ३ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; पोलिस दलात खळबळ

राज्यात यंदा कमी पाऊस पडणार? सरासरीच्या केवळ 90 टक्के पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT