Nandurbar News: चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्‍यांपासून बंद; ६० हजाराचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित

चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्‍यांपासून बंद; ६० हजाजाचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीवर दोन बॅरेजचा तयार करण्यात आले आहेत. या बॅरिजेसमुळे सिंचनाची मोठी सोय झाली असून, यामुळे (Nandurbar) शेती पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा आहे. मात्र या प्रकल्पाकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी गेल्या (Tapi River) दोन महिन्यापासून वीज पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडीत झाला आहे. तर इथे सुरक्षारक्षक देखील नसतो. (Live Marathi News)

Nandurbar News
Chalisgaon News: मुक्‍या प्राण्यांना वाचवायला धावला पण जीव गमावला; रेल्‍वे ट्रॅकवरील भीषण अपघात गुराख्यासह आठ जनावरांचा मृत्‍यू

तापी नदीवर प्रकल्पासाठी चारशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आहे. परंतु हा प्रकल्प नेमकं कशासाठी? असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तापी नदीचे पाणी महाराष्ट्राच्या वाटेला १३ TMC एवढं आहे. मात्र संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा गुजरात राज्यात जात आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही. सीसीटीव्ही बंद पडले आहेत, असे अनेक समस्या समोर येत आहेत.

Nandurbar News
Sanjay Raut News: 'जनता आधीच नपुंंसक म्हणत होती आता कोर्टानेही...' राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले 'सरकारचा जीव खोक्यात...'

प्रकल्पाच्या 60 हजार रुपये बिल थकीत आहे. दोन महिन्यापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देखील वेळ नाही. ऐन उन्हाळ्याच्या वेळेस पाण्याच्या समस्या उद्भवली तर पाणी कुठून कसं येणार असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा; अशी मागणी आता केली जात आहे. या विषयावर कुठल्या अधिकारी बोलण्यास तयार होत नाही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com