Sanjay Raut News: 'जनता आधीच नपुंंसक म्हणत होती आता कोर्टानेही...' राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले 'सरकारचा जीव खोक्यात...'

Maharashtra Politics: राज्यात अस्थिरता राहावी असा या सरकारचा उद्देश असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला...
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi NewsSaam Tv

Mumbai News: द्वेष मूलक वक्तव्यांबाबत (Hate Speech) सरकारकडून कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल काल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. सरकारी व्यवस्था निष्क्रीय, शिथील बनली आहे. ती वेळेवर काम करत नाही. जर शांतच बसून राहणार असेल तर मग ही व्यवस्था आहे तरी कशासाठी, असे म्हणत न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती.

याच मुद्द्यावरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी राज्याला गृहमंत्री आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.. (Latest Marathi News)

Sanjay Raut Latest Marathi News
Chhatrapati sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरातील राड्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; आंबादास दानवेंनी भाजप, एमआयएमला धरले जबाबदार

काय म्हणाले संजय राऊत?

"सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपूंसक म्हटले आहे, जे सरकारबद्दल जनता आधीपासूनच बोलत आहे, तेच आता न्यायालयाने म्हणले आहे," अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "आजवर सर्वोच्च न्यायालय असे कोणत्याच राज्याबद्दल बोलले नाही. पण महाराष्ट्र सरकार बद्दल बोलले आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा...

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना डोळे उघडू का? बोलू का, बोलू नको ? वाचू का नको, वाचू का? हे जे चालले आहे. त्यामुळेच न्यायालयाने जातीय दंगली वाढाव्या, तेढ राहावी असे ते काम करत असल्याचा ठपका लावल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut Latest Marathi News
Nagpur News : नागपूर पोलिसांचा असाही प्रताप! दंडाची रक्कम वळवली आपल्याच खात्यात; स्वतःचा QR वापरुन...

"राज्यात अस्थिरता राहावी असा या सरकारचा उद्देश असल्याचे म्हणत राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात नाही. फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्तपणे काम करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी या सरकारचा जीव धोक्यात आहे, असा टोलाही लगावला. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com