महाराष्ट्र

Nanded News: नांदेडमध्ये २४ तासांत दगावले २४ रुग्ण, रुग्णालय प्रशासनाने सांगितलं मृत्यूचं कारण...

Nanded Civil Hospital: नांदेडमध्ये २४ तासांत दगावले २४ रुग्ण, रुग्णालय प्रशासनाने सांगितलं मृत्यूचं कारण...

Satish Kengar

>> सुरज सावंत

24 Patients Death in Nanded Government Hospital: 

नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आता रुग्णालय प्रशासनाने रुग्णाचा मृत्यू कसा झाला याबाबत खुलासा केला आहे.

रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण होते, त्यातील पाच पुरुष व सात महिला सहभाग होता.

यातील चार रुग्णांचा हृदयविकाराने एका रुग्णाचा विषबाधा व एका रुग्णाचा जठर व्याधी तर, दोन रुग्ण एक किडनी व्याधी, एक रुग्ण प्रसती गुंतागुंत व तीन अपघात यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

यातील जी 12 मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यातील चार हे अंतिम अवस्थेत खाजगी रुग्णालयातून या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिलेली आहे.

या रुग्णालयात अत्यावश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन माध्यमातून आर्थिक वर्षासाठी बारा कोटींचा निधी देण्यात आला असून त्यात आणखी चार कोटी देखील मंजूर करण्यात आलं आहे.

मागील दोन दिवसात रुग्णालयात अत्यावश्यक रुग्ण हे विशेषतः अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्ह्यातून बाहेरून मोठ्या प्रमाणात आले असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT