Crop Damage Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News: नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; गारपिटीमुळे 17 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, 22 हजार शेतकरी बाधित

Unseasonal Rain Hailstorm Damage: नांदेडमध्ये अवकाळी पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यात गारपिटीमुळे 17 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झालं आहे.

Rohini Gudaghe

Unseasonal Rain Nanded Farmers Affected

मराठवाड्यातील नांदेड (Nanded) जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने तडाखा दिला आहे. सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या. त्यामुळं गहू, हरभरा, तूर, कापूस पिके आडवी पडली. यामुळं शेतकऱ्यांवर पुन्हा संकट उभं राहिलं आहे. अवकाळीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. हातात आलेल्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे. (latest rain news)

नांदेड जिल्ह्यात रविवारी दुपारी वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे (Unseasonal Rain) नांदेड जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विजांच्या कडकडासह गारपीट

नांदेड (Nanded News) जिल्ह्यात 17 हजार 229 हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठविला आहे. यात 64 गावातील 22 हजार शेतकरी बाधित झाले आहेत. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसादरम्यान वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याही नुकसानभपाईची मागणी शेतकरी वर्गाकडून होत (Unseasonal Rain Hailstorm Damage) आहे. नांदेड जिल्ह्यात मुदखेड, भोकर, उमरी, हिमायतनगर आणि किनवट या तालुक्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडासह गारपीट झाली होती.

नागपूरमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान

विदर्भात यवतमाळ, नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेकडो हेक्टरवरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पिकं शेतात आडवी पडली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे (Farmers Affected) पीकं कापणीवर आली होती, तर काही शेतकऱ्यांनी पीकं कापून शेतात ठेवली होती. हातातोंडांशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नागपूर जिल्ह्यात 4 हजार 29 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. 3 हजार 734 हेक्टरमधील शेत पिकांना याचा फटका बसल्याची माहिती प्राथमिक सर्वेक्षणात समोर आली (Unseasonal Rain) आहे. 10 आणि 11 फेब्रुवारीला नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT