Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Accident: नांदेडमध्ये भरधाव ट्रकने ८ दुचाकी चिरडल्या, अपघातामध्ये दोघे ठार

Nanded Truck Accident: नांदेड ते भोकर रस्त्यावरील बारड येथे ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Priya More

संजय सुर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या ८ दुचाकींना चिरडले. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. नांदेड ते भोकर रस्त्यावरील बारड येथे ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरवरून नांदेडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने बारड येथे ८ दुचाकींना चिरडल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना बारड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भोकरहून नांदेडकडे येत असलेल्या मालवाहू ट्रकच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानंतर ट्रकने बारड चौकातील जवळपास आठ दुचाकींना चिरडले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या गोविंद रामजी कोडेवाड (वय ४०, रा. खरबी, ता. भोकर) यांचा जागीच मृत्यू झाला. गोविंद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला होता. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना तात्काळ बारड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नांदेड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामध्ये ट्रकसोबत दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT