Bus Truck Accident At Rahud Ghat: मुंबई आग्रा महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; ६ ते ७ जण दगावल्याची भीती

Accident At Rahud Ghat Chandwad In Nashik: चांदवडच्या राहुड घाटात बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अपघातात ६ ते ७ प्रवाशी दगवल्याची माहिती मिळत आहे.
Bus Truck Accident
Bus Truck AccidentYandex

चांदवडच्या (Chandwad) राहुड घाटात बस आणि ट्रकचा अपघात (Bus Truck Accident) झाला आहे. या अपघातामध्ये अपघातात ६ ते ७ प्रवाशी दगवल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला (Nashik News) आहे. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहे. बसचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) राहुड घाटात हा भीषण अपघात झाला आहे. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील (Bus Truck Accident At Rahud Ghat) वाहतुक थांबविण्यात आली आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर बसचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात (Accident On Mumbai Agra Highway) झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आलं (Nashik Accident) आहे.

Bus Truck Accident
Bihar Accident News : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीवर काळाचा घाला; भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

बिहारमधील अपघाताची घटना

बिहारच्या भागलपूरमध्ये भीषण रोड अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातामध्ये ६ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात भागलपूरच्या घोघा पोलीस ठाणे हद्दीतील आमापूर गावाजवळ झालाय. वऱ्हाडाच्या गाडीला भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू तर तिघेजण जखमी झालेत. २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा हा अपघात झालाय.

घोघा पोलीस स्टेशन हद्दीत कारला ट्रकने धडक (Accident) दिल्याची माहिती मिळत आहे. वऱ्हाडी मंडळीवर काळाने घाला घातला आहे, तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. पोलीस या अपघाताप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

Bus Truck Accident
Accident News: अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा जागीच मृत्यू, हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com