Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Nanded News : नांदेड शहरातील सिडको भागात राहणाऱ्या परिवारातील ८ ते १० जणांनी बाभुळगाव परिसरातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : शेतातून आणलेल्या सोयाबीनच्या शेंगा उकळून खाल्ल्यानंतर नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या दहा जणांना विषबाधा झाली. दरम्यान उपचारादरम्यान एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाकीच्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नांदेडच्या (Nanded) नेरली गावात दूषित पाण्यामुळे ७०० लोकांना विषबाधा झाली होती. त्यानंतर आता दुसरा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात नांदेड शहरातील सिडको भागात राहणाऱ्या परिवारातील ८ ते १० जणांनी बाभुळगाव परिसरातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या. त्या शेंगा त्यांनी रात्री उकडून खाल्ल्या. शेंगा खाल्ल्यानंतर रात्री सर्वांना मळमळ होऊ लागली. त्रास जाणवत असल्याने लागलीच दहा जणांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान यातील मीरा नामदेव खानजोडे (वय १४) या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. तर विषबाधा झालेल्या अन्य ९ जणांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT