Vande Bharat Express Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat: नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू, थांबा- तिकीट अन् वेळापत्रक काय? वाचा सर्वकाही

Nanded- Mumbai Vande Bharat Express: नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनचे तिकीट, थांबा आणि वेळापत्रक काय? घ्या जाणून...

Priya More

Summary Pointers in Marathi

  • नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू झाली.

  • प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सोय उपलब्ध.

  • शीख समुदायासाठी हजूर साहिबला पोहोचणं सोपं.

  • आठवड्यातून सहा दिवस धावणार; बुधवारी आणि गुरुवारी सुटणार नाही.

वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या सेमी-हायस्पीड ट्रेनमुळे नांदेड आणि परभणीच्या नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे त्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातील यात्रेकरू, पर्यटक आणि नागरिकांना जागतिक दर्जाचा प्रवास करण्याची सोयी उपलब्ध करून देते.

नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा सर्वाधिक फायदा शीख समुदायाला होणार आहे. कारण शीख धर्माच्या पाच तख्तांपैकी एक असलेल्या नांदेडमधील हजूर साहिबला जाणं त्यांना अधिक सोपं होणार आहे. शीख समुदायाच्या लोकांना नांदेडमध्ये अवघ्या काही तासांमध्ये पोहचता येणार आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा, वेळापत्रक आणि तिकीट ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत...

थांबा कुठे?

नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर आणि शेवटचा थांबा सीएसएमटी या ठिकाणी असणार आहे.

तिकीटाचे दर किती?

नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकीटाचे दर देखील समोर आले आहेत. एसी चेअर कारचे तिकीट १,७५० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट ३,३०० रुपये असणार आहे.

वेळापत्रक -

वंदे भारत एक्स्प्रेस ०२७०५ ही नांदेडवरून पहाटे ५ वाजता सुटेल आणि दुपारी २.२५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सीएसएमटीवरून दुपारी १.१० वाजता सुटून रात्री १०.५० वाजता नांदेडला पोहोचेल.

आठवड्यातून ६ दिवस धावणार -

ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. बुधवारी नांदेडवरून आणि गुरूवारी मुंबईवरून ही ट्रेन धावणार नाही. ही ट्रेन ६१० किमी अंतर फक्त ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करणार आहे. महत्वाचे म्हणजे ही वंदे भारत एक्स्प्रेस २० डब्यांची असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT