Rashtrawadi Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'भाजपच्या नेत्यांना आम्ही प्रवेश दिलेला नाही', कारण.. अजित पवार गटातील नेते नेमकं काय म्हणाले?

Mahayuti government updates: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात इनकमिंग सुरूच. इतर पक्षातील काही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश.

Bhagyashree Kamble

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. मात्र, आता महायुतीत अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे. महायुतीत स्वबळाचे वारे वाहु लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे प्रत्येक नेत्याचं लक्ष आहे. अशावेळी महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी, तसे संकेत दिले जात आहेत.

तसेच फोडाफोडीचं देखील राजकारण सुरू आहे. महायुतीत अलबेल नसल्याचं चित्र असतानाच, भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात इतर पक्षातील काही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय. तसेच भाजपतील काही पदाधिकारी देखील अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश?

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या नायगाव तालुक्यात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. तसेच भाजपतील काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश करू इच्छित असल्याचं बोललं जातंय.

याबाबत आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, 'मी अगोदरच सांगितलं की, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही प्रवेश दिलेला नाही. आज जे पदाधिकारी आले ते इतर पक्षांतील होते. काही नव्यानं राजकारणामध्ये आलेले होते. या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. खरंतर आज प्रवेशाचा मेळावाच नव्हता, तर शिवराज पाटील होटाळकर यांनी सदस्य नोंदणी ठेवली होती त्याचाच मोठं स्वरूप होऊन सभेत रूपांतर झालं'.

नांदेडच्या भोकरमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर नायगाव तालुक्यातही अजित पवार गटात इनकमिंग सुरू झाली. 'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी हा पक्ष एक नंबरचा पक्ष राहील', असा विश्वासही यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT