Nanded Crime News  saam tv
महाराष्ट्र

लव्ह स्टोरीचा भयंकर अंत! तरुणाची निर्घृण हत्या; मुलीचा बाप अन् भाऊ हाती लागला अन् गूढ उकललं

Nanded Crime News : प्रेम प्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. गावातीलच एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते.

Nandkumar Joshi

  • प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या

  • हत्येनंतर मृतदेह विहिरीत फेकला

  • गावातीलच मुलीसोबत होते प्रेमसंबंध

  • मुलीच्या बापासह भावालाही अटक

संजय सूर्यवंशी, नांदेड | साम टीव्ही

१७ वर्षांच्या युवकाच्या हत्येनं अख्खा नांदेड जिल्हा हादरून गेला. प्रेम प्रकरणातून या तरुणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. पण युवकाच्या हत्येनं या प्रेमाचा भयंकर शेवट झाला. पोलिसांनी संशयावरून मुलीच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतल्यानंतर या हत्येच्या घटनेचं गूढ उकललं.

नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातील कांडली या गावात ही धक्कादायक आणि हादरवणारी घटना घडली. नकुल पावडे असं हत्या झालेल्या या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या १७ वर्षांचा होता. गावातीलच मुलीवर त्याचा जीव जडला होता. त्या दोघांचेही प्रेमसंबंध होते. पण याच प्रेमसंबंधांनी घात केला. नकुलला आपला जीव गमवावा लागला.

हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला

गावातील मुलीवर प्रेम करणारा नकुल शनिवारपासून बेपत्ता होता. त्याची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपींनी त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता. भोकर तालुक्यातील सिंगारवाडी शिवारातील विहिरीत त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मुलीच्या वडील आणि भावानेच त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

असा झाला हत्येचा उलगडा

प्राथमिक माहितीनुसार, प्रेमसंबंधांतून नकुलची हत्या झाली. त्याची हत्या करून मृतदेह सिंगारवाडी शिवारातील विहिरीत फेकण्यात आला होता. गावातीलच मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली होती. शनिवारपासून नकुल बेपत्ता होता.पोलिसांनी या प्रकरणात संशयित म्हणून मुलीच्या बापाला आणि भावाला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी नकुलची हत्या केल्याची कबुली दिली.दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड, काँग्रेसचे १२ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

V Neck Blouse Design: व्ही नेक ब्लाऊज डिझाईन्स, हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

Maharashtra Live News Update: अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू झालेल्या गरोदर मातेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

Prajakta Mali : 'रानबाजार'नंतर आणखी एक जबरदस्त वेब सीरिज घेऊन येतेय प्राजक्ता माळी, 'त्या' फोटोनं वाढली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT