Nanded Government Medical College Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Death News : नांदेडमध्ये मृत्यूतांडव सुरूच, पुन्हा २४ तासांत १५ रुग्ण दगावले, काय आहे कारण?

Government Medical College : नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूतांडव अजून चालूच आहे.

Bharat Jadhav

नांदेड संजय सूर्यवंशी

Nanded Government Medical College :

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविदयालयात गेल्या २४ तासात अजून १५ जणांचा मृत्यू झालाय. यात ६ अर्भक, २ बालकांचा समावेश. गेल्या ७ दिवसात ८३ मृत्यूची नोंद झालीय. त्यात ३७ अर्भक आणि बालकांचा समावेश. (Latest News)

या शासकीय रुग्णालयात औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, यांनी या रुग्णालयाला भेट देत सरकारवर निशाणा साधला होता. परंतु या रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या रुग्णालयात २४ तासात पुन्हा १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

  • २ ऑक्टोबर - २४ तासात २४ मृत्यू यात १२ नवजात अर्भक

  • ३ ऑक्टोबर - २४ तासात ७ मृत्यू त्यात ४ अर्भक

  • ४ ऑक्टोबर - २४ तासात ६ मृत्यू त्यात २ अर्भक

  • ५ ऑक्टोबर २४ तासात १४ मृत्यू त्यात ५ अर्भक

  • ६ ऑक्टोबर - २४ तासात ११ मृत्यू त्यात ४ अर्भक

  • ७ - ऑक्टोबर - २४ तासात ६ मृत्यू १अर्भक ,१ बालकाचा समावेश

  • ८ ऑक्टोबर - २४ तासात १५, मृत्यू ६ अर्भक , २ बालकं

गेल्या सात दिवसात एकूण ८३ जणांचा मृत्यू झालाय. यात ३७ अर्भक , लहान बालकांचा समावेश

शासकीय रुग्णालयात औषधी पुरवठा करणाऱ्या हाफकीनने औषधी खरेदी बंद केली आहे. यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान या सर्व प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.

तर उच्च न्यायालयानं देखील सरकारला खडेबोल सुनावलेत. "राज्यात आरोग्य सेवेवर मनुष्यबळ कमतरतेचे दडपण आहे असे उत्तर देऊ नका, अशा शब्दात महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांची कानउघडणी न्यायालयानं केलीय. राज्य सरकार या नात्याने जनतेला मुलभूत सेवा पुरवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT