BJP and Shinde Sena news Saam Tv
महाराष्ट्र

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

Nanded politics : भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जाणून घ्या कोणी कोणावर आरोप केलेत.

Saam Tv

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

भाजपला पाठिंबा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटातील जिल्हा प्रमुखांनी आमदारांना थेट बांडगूळ म्हटलं आहे. जिल्हा प्रमुखांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली. या टीकेमुळे नांदेडच्या शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळलाय.

नांदेडमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्याची इच्छा शिंदे गटाच्या तीन आमदारांची होती. नांदेड उत्तरचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी युती न करता तब्बल 40 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यानंतर आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबुराव कदम यांनी थेट अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता.

नांदेड उत्तरमध्ये शिंदे गटाचे तीन उमेदवार निवडून आले. तर नांदेड दक्षिणमध्ये एकच उमेदवार निवडून आलाय. आमदार कल्याणकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्यांनतर शिंदे गटाचे दक्षिणचे जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली.

'महापालिकेत भ्रष्टाचाराला नक्कीच विरोध करणार. ज्याला ताटाखालचं मांजर होण्याची इच्छा आहे. अशा बांडगुळ आमदाराचा जाहीर निषेध, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आम्ही भाजप विरोधात लढलो. त्यांच्यासोबत युती करण्याचा आमदाराचा निर्णय चुकीचा असल्याचे गिरडे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT