Diabetes Diet Tips : नाश्त्याआधी की दुपारच्या जेवणानंतर, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? पाहा

Namdeo Kumbhar

लग्नसराईत मिठाई खाण्याची योग्य वेळ कोणती?

लग्नसराई आणि सणासुदीच्या दिवसांत घरात मिठाईचे बॉक्स येतात. अशा वेळी सकाळी नाश्त्याआधीच एखादा बर्फीचा तुकडा खाण्याचा मोह होतो, पण हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे, हे मुंबईतील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. डेव्हिड चँडी यांनी सांगितले आहे.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

रिकाम्या पोटी गोड खाल्ल्याने काय होते?

सकाळी रिकाम्या पोटी मिठाई खाल्ल्यास रक्तातील साखर (Blood Sugar) खूप लवकर वाढते. पोटात इतर कोणतेही अन्न नसल्यामुळे साखर थेट रक्तात शोषली जाते, ज्यामुळे मधुमेहींना मोठा त्रास होऊ शकतो.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

मिठाईत फक्त साखरच नसते!

मिठाईमध्ये केवळ साखरच असते असे नाही, तर ती बनवण्यासाठी वापरलेला मैदा, रवा आणि दूध यांतूनही शरीराला भरपूर कर्बोदके (Carbohydrates) मिळतात. त्यामुळे मिठाईचा तुकडा छोटा असला तरी साखरेवर परिणाम होतो.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

दुपारच्या जेवणानंतर गोड खाणे का उत्तम?

डॉ. चँडी यांच्या मते, गोड खाण्यावर पूर्ण बंदी घालण्यापेक्षा ते दुपारच्या संतुलित जेवणानंतर खाणे केव्हाही चांगले. जेवणानंतर खाल्लेल्या मिठाईमुळे रक्तातील साखर एकदम न वाढता हळूहळू वाढते.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

जेवणातील फायबर आणि प्रोटीन कसे मदत करतात?

जेवणातील डाळी आणि कडधान्यांमधील फायबर पोटात एक प्रकारचे जेल तयार करतात, ज्यामुळे साखर हळू पचते. तसेच पनीर, दही, अंडी किंवा मासे यांतील प्रोटीन आणि फॅट्समुळे पोट लवकर रिकामे होत नाही.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

आधी काय खावे आणि गोड कधी खावे?

जेवताना सर्वात आधी भरपूर फायबर असलेल्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत. त्यानंतर पोळी-भात आणि सर्वात शेवटी मिठाईचा छोटा तुकडा खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

तूप, खवा आणि सुकामेव्याचे सत्य काय?

तूप, खवा आणि काजू-बदाम यांतील स्निग्धांशामुळे पचन संथ होते आणि साखर थोड्या उशिरा वाढते. मात्र, त्यामुळे मिठाईतील साखर किंवा कॅलरीज अजिबात कमी होत नाहीत, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

इन्सुलिन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा

तूप आणि खवा असलेली जड मिठाई खाल्ल्यास रक्तातील साखर उशिरा वाढते (Delayed Peak). जे रुग्ण इन्सुलिन घेतात, त्यांच्यासाठी ही उशिरा वाढणारी साखर अडचणीची ठरू शकते.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

मधुमेहींनी गोड खाण्याचे नियोजन कसे करावे?

जर तुम्हाला जेवणात मिठाई खायची असेल, तर ताटातील भात किंवा पोळीचे प्रमाण थोडे कमी करा (दोन्ही पूर्ण बंद करू नका). तसेच ताटात पालेभाज्या आणि डाळी नक्की ठेवा, जेणेकरून एकूण कर्बोदके संतुलित राहतील.

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest

महत्त्वाचा सल्ला

संतुलित जेवणानंतर अगदी छोटा तुकडा मिठाई खाणे केव्हाही चांगले. पण ताटात आधीच भरपूर भात, पोळी किंवा बटाटा असेल, तर वरून गोड खाणे टाळा. सणासुदीला कधीतरी आणि मर्यादित प्रमाणातच मिठाईचा आस्वाद घ्या!

best time to eat sweets for blood sugar control, | pinterest
Ladki Bahin Yojana October Installment date update | saam TV
Ladki Bahin Yojana : १,५०० रुपये खात्यात कधी जमा होणार? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी