आगीत जळून एका बालकाचा मृत्यू
आगीत जळून एका बालकाचा मृत्यू 
महाराष्ट्र

नांदेड : गंभीर भाजलेल्या आठ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Pralhad Kamble

नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या वाजेगाव परिसरातील तथागतनगरमध्ये राहणारा इरफान शेख फैय्याज (वय आठ वर्ष) हा घरासमोर पेटविलेल्या जाळात रविवारी (ता. २५) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास गंभीर भाजला होता. त्याच्यावर विष्णूपुरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात करण्यात आली. Nanded- eight-year-old- boy- died- burns -while treatment

घरासमोरील कचरा जाळत असताना इरफान शेख भाजला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना मात्र मृत्यू झाला. वाजेगाव परिसरातील तथागतनगरमध्ये राहणारा इरफान शेख फैय्याज (वय आठ वर्ष) हा आपल्या घरासमोरील कचरा जाळत होता. कचरा जाळत असताना त्याच्या अंगावरील कपड्याने अचानक पेट घेतला. यात त्याचे हात, पोट, चेहरा, छाती चांगलीच भाजली होती. यात तो गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्याला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

हेही वाचा- शिबिरामध्ये 177 रुग्णांनी विविध आजारांची तपासणी करुन घेतली तर 150 नागरिकांनी कोविड लस घेतली.

विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात बालकवार्ड क्रमांक 57 मध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेख इमरान शेख फैयाज याच्या माहितीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार शेख जावेद करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

SCROLL FOR NEXT