संजय सुर्यवंशी
Nanded Crime News: पुण्यातील कोयता गँगने भल्याभल्यांना घाम फुटला होता. रस्त्यावर सातत्याने त्यांच्यकडून दहशत पसरवली जात होती. पुण्यातील या कोयता गँगचा पोलिसांनी सुपडासाप केलाय. मात्र आता नांदेडमधून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. नांदेडमध्ये कोयत्याने हात छाटणारी गँग सक्रिय झालीये. किरकोळ वादातून फळ विक्रेत्याने कोयत्याने तरुणाचे मनगटापासून दोन्ही हात छाटलेत. नांदेड शहरातील भाग्यनगर हद्दीतील ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)
शुल्लक कारणावरून होणारा वाद आता जीवे मारण्यापर्यंत जात आहे. आरोपीमध्ये कुठलीही भीती राहिली नाहीये. नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरून अशा अनेक घटना देखील घडल्या आहेत. मात्र बुधवारी भाग्यनगर हद्दीत घडलेली घटना अंगाचा थरकाप उडवणारी आहे. केवळ हसल्याच्या कारणावरुन एका फळ विक्रेत्याने भाजीपाला विकणाऱ्या तरुणाचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटलेत.
शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडलीय. आठवडी बाजारात भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज असं जखमीचं नाव आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आद्रक, लसूण विक्रीसाठी गेला होता. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा तरुण देखील हातगाड्यावर फळ विक्री करत होता.
यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास तो बाजारात आला. काही क्षणातच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले. तसेच पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले.
घटनेनंतर बाजारात धावपळ उडाली होती. घटनेनंतर जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हात छाटल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशा प्रकारे घटना घडल्याने कोयत्याने हाथ छाटणारी गँग सक्रिय झाल्याच दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.