Nanded Crime News Father killed daughter due to love affair in Mudkhed taluka manu tanda village  Saam TV
महाराष्ट्र

Nanded Crime: मुलीचे नात्यातील तरुणासोबत प्रेमसंबंध, बापाला कळताच घडलं भयंकर; ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड हादरलं

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. मुलगी प्रेमविवाहाचा हट्ट करत असल्याने वडिलांनी तिची क्रूरतेने हत्या केली.

Satish Daud

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. मुलगी प्रेमविवाहाचा हट्ट करत असल्याने वडिलांनी तिची क्रूरतेने हत्या केली. त्यानंतर मृतदेह जाळून टाकून पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तब्बल ८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत मुलीचे वय अवघं १६ वर्ष आहे. तिचे मुखेड तालुक्यातील राजुरा तांडा येथे राहणाऱ्या नात्यातील मुलासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण मुलीच्या वडिलांना लागताच त्यांनी याला विरोध केला. तरी देखील मुलीने नातेवाईकातील त्या मुलासोबत लग्न करण्याचा हट धरला होता.

याचाच राग मनात धरून २ ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास आरोपी पित्याने राहत्या घरी कोयत्याने मुलीच्या मानेवर आणि हातावर वार केले. रक्तभंबाळ झालेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला.

त्यानंतर घरातील रक्ताचे डाग पाण्याने पुसले आणि कोयता ऊसाच्या शेतात फेकून दिला. घटनेबद्दल माहिती दिल्यास पत्नीला जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने दिली होती. दरम्यान माझी मुलगी आजारी होती, आजाराला कंटाळून तिने गळफास घेतला, त्यामुळे घाई गडबडीने तिचा अंतविधी केल्याचा बनाव आरोपी वडिलाकडून केला जातं होता.

अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हत्येचा उलघडा केला. मयत मुलीच्या आईच्या फिर्यादी वरुन पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके हे करीत आहेत. पित्याने आपल्याच मुलीची एवढ्या क्रूरतेने हत्या केल्याने हळहळ व्यक्त होतं आहे.

अशी उघडकीस आली घटना

मुलीच्या मृत्युनंतर गावात विविध चर्चेला उधाण आलं होतं. पोलिसांना देखील या घटनेचा संशय आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. घटनेचा उलगडा करण्याकरिता मुक्रमाबाद पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. पोलिसांनी अनेक गोपनीय जवाब नोंदविले.

९ ऑगस्ट रोजी तांड्यातील काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ज्या ठिकाण मुलीला जाळण्यात आले, त्या ठिकाणची तपासणी करत हाडाचे नमुने आणि राख प्रयोगशाळेत पाठवली. त्यानंतर मृतक मुलीच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT