Nanded Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Nanded Crime News: कृरतेचा कळस! 6 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या, नांदेड जिल्ह्यात खळबळ

Nanded Crime News: मुदखेड पोलीस ठाणे हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं आहे. मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 6 वर्षीय चिमुकली रविवारी दुपारपासून बेपत्ता होती.

Sandeep Gawade

Nanded Crime News

मुदखेड पोलीस ठाणे हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं आहे. मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 6 वर्षीय चिमुकली रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. मुलगी सायंकाळ घरी न परतल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोध घेतला पण मुलगी मिळाली नाही. सोमवारी सकाळी चिमुकलीचा मृतदेह मुदखेड ऊमरी रोडवर रस्त्याशेजारी झुडुपात फेकलेला आढळला. या घटनेमुळे मुंदखेड परिसर हादरून गेला आहे.

गावापासून 12 किमी दूर चिमुकलीचा मृतदेह आढळला आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही संशयित आरोपी असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आज मंगळवारी सकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गावात जाऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. घटना अतिशय चीड निर्माण करणारी असून पोलीसांनी तात्काळ आरोपींचा शोध लावावा अशी मगणी त्यांनी केली आहे. भाजप आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली. आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT