Sharad Mohol Case: शरद मोहोळच्या हत्येचा कट एक महिन्याआधीच शिजला; पुणे पोलिसांनी कोर्टात दिली महत्वाची माहिती

Sharad Mohol Case: मोहोळ यांच्या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे हादरवणाऱ्या शरद मोहोळच्या हत्येचा कट एक महिन्याआधीच शिजल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.
Sharad Mohol killer
Sharad Mohol killerSaam TV
Published On

सचिन जाधव, पुणे

Sharad Mohol case:

गँगस्टर शरद मोहोळचा हत्याकांडानंतर टोळीयुद्ध सुरु झाल्याची चर्चा आहे. मोहोळ यांच्या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नवनवे खुलासे होत आहे. पुणे हादरवणाऱ्या शरद मोहोळच्या हत्येचा कट एक महिन्याआधीच शिजल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. (Latest Marathi News)

आरोपींनी हत्येआधी बोलावली महत्वाची बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे हादरवणाऱ्या मोहोळ हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना आज मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आलं आहे. पोलिसांनी आज रामदास उर्फ वाघ्या मारणे आणि विठ्ठल महादेव शेलार या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. या दोन्ही आरोपींनी शरद मोहोळ यांच्या हत्येच्या एक महिन्याआधी महत्वाची बैठक बोलावली होती, अशी माहिती पुणे पोलिसांनी कोर्टात दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Mohol killer
Crime News: कचरा वेचणाऱ्या महिलेने २ वर्षांचं बाळ उचलून नेलं; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

रामदास उर्फ वाघ्या मारणे आणि विठ्ठल महादेव शेलार या आरोपींनी त्याच बैठकीत शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही आरोपींनी बोलावलेल्या बैठकीत अनेक जण सहभागी झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

Sharad Mohol killer
Jalgaon Crime News: धक्कादायक! क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराची हत्या

शरद मोहोळ हत्या प्रकरणाच्या हत्याकांडात अजून एक मुख्य आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे. त्या मुख्य आरोपीसोबत मारणे आणि शेलारची बैठक झाली, असा संशय पोलिसांना आहे.

Sharad Mohol killer
Kalyan Crime News: टेप का बंद केला , कुणी तक्रार केली..नाव सांगा , तरुणांचा कपडे काढून पोलीस स्थानकातच धिंगाणा

गुंड विठ्ठल शेलारला कुठून ताब्यात घेण्यात आलं?

गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल विठ्ठल शेलारसह ११ जणांना ताब्यात घेतले. रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com