संजय सुर्यवंशी, नांदेड|ता. १६ मार्च २०२४
मनात जिद्द अन् इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही असं म्हणतात. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नांदेडच्या एका तरुणीने क्षितिजापल्याड झेप घेत सर्वात कमी वयाची पायलट होण्याचा विक्रम केला आहे. युक्ता बियाणी असे या तरुणीचे नाव असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. जाणून घेऊया युक्तीची सक्सेस स्टोरी.
जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर देशात सर्वात कमी वयात व्यावसायिक पायलट बनण्याचा विक्रम युक्ता बियाणी या नांदेडच्या (Nanded) युवतीने केला आहे. या विक्रमासोबतच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पायलट होणारी युक्ता बियाणी ही देशातील पहिली तरुणी ठरली आहे. युक्ताला लहानपणापासूनचं पायलट बनायचं होतं. यासाठी तिने बारावीनंतरच तयारीला सुरूवात केली.
बारावीनंतर तिने मुंबई येथे सहा महिने विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बारामती येथील फ्लाईंग स्कुलमध्ये तिची निवड झाली. या प्रशिक्षणा दरम्यान तिने 200 तास विमान चालवले. तिच्या या कष्ट अन् जिद्दीचे फळ म्हणजेच सर्वात कमी वयात पायलट होण्याचा मान तिने मिळवला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, पायलट होणं हे माझं लहानपासूनचं स्वप्न होतं. त्यासाठी मी १२ वीपासून प्रयत्न केले. आता लवकरच एअरइंडिया या कंपनीत निवड होणार असल्याचे युक्ताने बियाणीने सांगितले आहे. युक्ताही नांदेडमधील प्रसिद्ध उद्योगपती प्रविण बियाणी यांची मुलगी आहे. युक्ताच्या यशाबद्दल तिच्या आई वडिलांसह अनेकांनी तिचे अभिनंदन केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.