NCP Woman Candidate Rescued by Police Saam
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीत Kidnapping? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार अन् पतीला डांबून ठेवलं, 'असा' लागला सुगावा

NCP Woman Candidate Rescued by Police: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार अन् त्यांच्या पतीला डांबून ठेवल्याचा प्रकार उघड. परिसरात खळबळ. नेमकं घडलं काय?

Bhagyashree Kamble

  • मराठवाडा जनहित पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात वाद

  • राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार अन् त्यांच्या पतीला डांबून ठेवलं

  • पोलिसांकडून त्यांची सुखरूप सुटका

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काही उमेदवार स्वत:हून उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. तर, काहींवर दबाव किंवा अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. मात्र, नांदेडमध्ये वेगळंच चित्र समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार आणि उमेदवाराच्या पतीला डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरला आहे. अशातच नांदेडमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार आणि त्यांच्या पतीला डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

नांदेडच्या बिलोलीत स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ झाला. वॉर्ड क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विजयालक्ष्मी हरणे या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात मराठवाडा जनहित पार्टीकडून मैथिली कुलकर्णी या रिंगणात आहेत. विजयालक्ष्मी यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे हरणे यांच्यासह त्यांच्या पती यांना घरात डांबून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे नांदेडच्या बिलोलीत सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विजयालक्ष्मी हरणे आणि त्यांच्या पतीची सुरक्षित सुटका केली. दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar: डोळ्याला गॉगल लावलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

का रे दुरावा! फडणवीस-शिंदेंनी एकमेंकाशी बोलणं टाळलं, राजकीय वर्तुळात चर्चांना जोर, पाहा व्हिडिओ

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा लग्न सोहळा धुमधडाक्यात, नवरदेव पलाश मुच्छल सांगलीत दाखल

अमराठी महापौर दिलात तर रस्त्यावर उतरु! सर्व पक्षांना कोणी दिला इशारा? VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगावात घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमधील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT