नांदेडच्या भोकर तालुक्यातून अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)
नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे अज्ञात वाहनाची धडक मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांना बसली. या धडकेत दोन्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत संकेत पाशेमवाड (17) आणि वैभव येळने (18) दोन विदयार्थी ठार झाले. नांदेड-भोकर मार्गावरील भोसी गावाच्या महामार्गावरून हे दोन्ही विद्यार्थी चालत जात होते. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले, यात त्यांचा मृत्यू झाला. भोकर पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी बस स्थानकाजवळ भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला. रस्त्यावरून जात असलेल्या टँकरने बस स्थानकाजवळ असलेल्या बोगद्याला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात टँकरचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे.
टँकरचा धडकेमुळे रस्त्यावर 100 मीटरपर्यंत ऑइलचे फवारे उडत होते. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून वर्तवण्यात येत आहेत. अपघातामुळे रस्त्यालगत ऑइल सांडलेलं पाहायला मिळालं. या जोरदार धडकेत टँकरला आग न लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
यवतमाळातमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारला मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. कवडू पुसनाके असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनासथळी वाहतूक पोलीस दाखल झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.