Nanded Accident Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident:दोन मोटारसायकची समोरासमोर धडक; 3 ठार, 2 जण गंभीर जखमी

Bike Accident : भोकर ते म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव गावाच्या शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात अपघात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झालेत.

Bharat Jadhav

संजय सूर्यवंशी, साम प्रतिनिधी

नांदेडच्या भोकर ते म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. भोकर ते म्हैसा या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळढव शिवारातील वळण रस्त्यावर दोन्ही मोटारसायकल समोरासमोर धडकल्या.

हाती आलेल्या माहितीनुसार,अपघातात मृत पावलेल्या तिघांची ओळख पटलीय. गंगाधर विश्वनाथ म्हैसूरे (वय ५५, रा. शिळवणी ता. देगलूर. ह मु. भोकर), व परसराम किशन डाकोरे (वय ५०, रा. पांडुरणा ता. भोकर) ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड (वय २५, रा. नांदा बु.) अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. गंगाधर विश्वनाथ म्हैसूरे आणि परसराम किशन डाकोरे हे दोघे कै. व्यंकटराव देशमुख निवासी आश्रमशाळा मातुळ येथे मदतनीस म्हणून काम करत होते.

विनायक पोशट्टी बोरवाड (वय २३, रा. नांदा बु.) आणि श्रावण हनुमंत पेडेमोडे (वय २३, रा. कुंभरगाव ता. बिलोली) हे दोघे गंभीर जखमी झालेत. या दोघांना आधी भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे नेण्यात आले. या अपघाताची माहिती कळताच भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाई करणार

Ajit Pawar Plane Crash: दादांच्या विमानाचा पायलट 'सुसाईड बॉम्बर'? रोहित पवारांनंतर अमोल मिटकरींचाही वैमानिकावर संशय

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

SCROLL FOR NEXT