Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

भीषण दुर्घटना! भरधाव कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू

या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

संतोष जोशी

नांदेड : भरधाव वेगात येणाऱ्या कंटनेरने रिक्षाला जोरदार धडक (Accident) दिली. या धडकेत रिक्षात बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी नांदेड-हैदराबाद महामार्गावर (Nanded) घडली. अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरने रिक्षाला अक्षरश: 100 फूट फरपटत नेले. (Nanded Accident News)

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील नांदेड-हैदराबाद महामार्गावरील मेनुर जवळ भरधाव आलेल्या कंटनेरने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकासह रिक्षातून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने रिक्षाला अक्षरश: 100 फूट फरफटत नेले. त्यामुळे रिक्षाचा चक्काचूर झाला.

दरम्यान, हा भीषण अपघात घडताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची ओळख पटली असून अन्य तिघांची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी बिचकुंदा पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT