Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Accident: अपघातात नवरीसह पाच जणांचा मृत्यू, ६ जखमी

हा अपघात भोकर-कीनवट रस्त्यावर सोमठाणा शिवारात काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड - लग्नसोहळा उरकूर परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये नवऱ्या मुलीचादेखील समावेश आहे. तर या अपघातात 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. हा अपघात भोकर-कीनवट रस्त्यावर सोमठाणा शिवारात काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला.

हे देखील पहा -

नववधू पुजा ज्ञानेश्वर पामलवार , नववधूचा भाऊ दत्ता ज्ञानेश्वर पामलवार, माधव पुरबाजी सोपेवाड, सुनील दिंगाबर धोटे आणि एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सुनीता अविनाश टोकलवार , कुमारी गौरी माधव चोपवाड, अविनाश टोकलवार, अभिनंदन मधुकर कसबे अशी जखमींची नवे आहे.

शनिवारी (ता. २१) साखरायेथे पूजा हिचे तिच्या राहत्या गावी लग्न झाले. लग्नानंतर आरती परतणी करुन नववधू आणि नवरदेव हे जरीकोट येथे आले आणि सोमवारी साखरा येथे परत निघाले होते. त्यावेळी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कीनवटकडून भरधाव वेगात येणारा टेम्पोची मॅजीक समोरासमोर जोराची धडक झाली आणि या अपघातात नववधू पूजासह अन्य चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT