Nandigram Express Saam Tv
महाराष्ट्र

नंदीग्राम एक्सप्रेसखाली चिरडून २२ मेढ्यांचा मृत्यू; नांदेड जिल्ह्यातील दुर्देवी घटना

एकाचवेळी 22 मेढ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष जोशी

नांदेड : अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसखाली (Accident) चिरडून 22 मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवारी सायंकाळी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सिरमट्टी गावाजवळ घडली. मेंढपाळ हा मेंढ्यांना घेऊन रेल्वे रुळ पार करत होता. त्यावेळी ही घटना घडली. एकाचवेळी 22 मेढ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nanded Accident News)

प्राप्त माहितीनुसार, किनवट तालुक्यातील सिरमपट्टी गावाजवळ एक मेंढपाळ आपल्या मेढ्यांना घेऊन रेल्वे रुळ ओलांडत होता. त्याचवेळी तेलंगाणातील आदिलाबाद येथून भरधाव वेगात नंदीग्राम एक्सप्रेस आली. रेल्वे चालकाला मेंढ्या रेल्वे रूळावर दिसल्या. त्यामुळे त्याने इमर्जन्सी ब्रेक मारला. मात्र तरीही मेंढ्या रेल्वे खाली आल्या. या घटनेत 10 मेंढ्या जागेवरच गतप्राण झाल्या. (Nanded Railway Accident News)

दरम्यान, 12 जखमी मेंढ्यांना गावकऱ्यांनी उपचारासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना 12 मेढ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून मेढपाळावर आर्थिक संकट ओढवलं आहे. या घटनेची रेल्वे पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gola Bhat Recipe : संडे स्पेशल मेन्यू; विदर्भ स्टाइल गोळा भात, अस्सल वऱ्हाडी पदार्थ

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २५ दिवस! लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹१५००

Maharashtra Live News Update: अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरायला नकार?

Palak Muchhal : स्मृती मानधना-पलाश मुच्छलच्या लग्नाबद्दल महत्त्वाची अपडेट, बहीण पलक मुच्छल काय म्हणाली?

Pratiyuti Yog 2026: 9 जानेवारीपासून घरात येणार फक्त पैसा; शुक्र आणि गुरूच्या खास योगाने तयार होणार प्रतियुति दृष्टि योग

SCROLL FOR NEXT