Jalna Crime : दारूच्या नशेत त्याने थेट रुग्णालयच पेटवून दिलं, धक्कादायक कारण उघड

ही धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावात घडली.
Jalna Ghansawangi Shinde Hospital
Jalna Ghansawangi Shinde HospitalSaam TV
Published On

जालना : दारूच्या नशेत असलेल्या रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टरने नकार दिला. याचाच राग मनात धरून रुग्णाने आठ दिवसानंतर रुग्णालय पेटवून दिलं. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावात घडली. यामध्ये रुग्णालयाचे मोठे नुकसान झालं असून सर्व साहित्य जाळून खाक झाले. याप्रकरणी डॉ. शिंदे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalna Crime News)

Jalna Ghansawangi Shinde Hospital
Jalna Crime : 20 हजारांची लाच घेताना उपविभागीय भूसंपादन अधिकारी रंगेहाथ पकडला

मिळालेल्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावात तान्हाजी शिंदे यांचे रुग्णालय आहे. गेल्या चार वर्षापासुन बीएचएमएस डॉक्टर असलेले तानाजी शिंदे हे रुग्णावर उपचार करतात. दरम्यान गावातील विशाल दत्ता जाधव हा दारूच्या नशेत आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडे उपचारासाठी आला होता.तो दारूच्या नशेत अश्लील भाषांचा वापर करून शिवीगाळ करत असल्याने शिंदे यांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला.

त्यातच रात्री उशीर झाला असल्याने शिंदे हे रुग्णालय बंद करून घरी निघून गेले. दरम्यान, विशाल हा 8 दिवसानंतर पुन्हा रविवारी सायंकाळी शिंदे यांच्या रुग्णालयात आला. माझ्यावर उपचार का नाही केले असं म्हणत विशालने शिंदे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी शिंदे यांनी रुग्णालय बंद केले आणि ते घरी निघून गेले. (Jalna Todays News)

Jalna Ghansawangi Shinde Hospital
NEET परीक्षेसाठी विद्यार्थीनींना काढायला लावले अंतर्वस्त्र; केरळमधील धक्कादायक प्रकार

दरम्यान, शिंदे घरी जाताच विशाल याने बाटलीत आणलेले पेट्रोल टाकून रुग्णालय पेटवून दिलं आणि घटनास्थळावरून पळून गेला. विशाल याने रुग्णालय पेटून दिल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी डॉ. शिंदे यांना दिली. माहिती मिळताच शिंदे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

मात्र तोपर्यंत रुग्णालयातील साहित्य औषधी पूर्णपणे जळून खाक झाले होते. याप्रकरणी डॉ.शिंदे यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात विशाल दत्ता जाधवर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास घनसावंगी पोलिस करत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com