NANDED SHOCKER: 3-YEAR-OLD GIRL ALLEGEDLY ASSAULTED AFTER CHOCOLATE LURE; ACCUSED ABSCONDING saam tv
महाराष्ट्र

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

Three-Year-Old Girl Allegedly Assaulted After Being Lured With Chocolate In Nanded: नांदेडच्या लोहा तालुक्यात तीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप. सोनखेड पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेडच्या लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तीन वर्षीय चिमकुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका गावात तीन वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून सोनखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे.

सोमवारी सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर तो मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यामुळे, आईने विचारपूस केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे तिने सांगितले मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध पोक्सो आणि अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अत्याचारातील घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून विविध कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT