Parbhani Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिसेविकेवर नानलपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेमुळे सामान्य रुग्णालयात गाेंधळ उडाला.

राजेश काटकर

Parbhani Crime News : परभणी (parbhani) शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात (hospital) एका अधिसेविकेने परिसेविकेस मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नानलपेठ पाेलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील मंदा प्रकाश साबणे या परिसेविकेने पाेलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नाेंदविण्यासाठी घटनाक्रम नमूद केला. त्यानंतर नानलपेठ पाेलिस ठाण्यात अधिसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Maharashtra News)

याबाबत फिर्यादीने दिलेली माहिती अशी कार्यालयात कामकाज करीत असताना अधिसेविका मीनाक्षी सूर्यवंशी यांनी परिसेविका मंदा साबणे (फिर्यादी) यांना फोन करून अस्थिव्यंग विभागात बोलावले. या ठिकाणी गेल्यावर मंदा साबणे यांना मीनाक्षी सूर्यवंशी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. यात जखमी (injured) झालेल्या साबणे यांना उपचारासाठी अपघात (accident) विभागात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मीनाक्षी सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gangaram Gavankar Passes Away: 'वस्त्रहरण'चे नाटककार काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

तारीख ठरली! 'Bigg Boss 19'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होणार, टॉप 5 फायनलिस्ट कोण?

Sambhajinagar : ऑनलाईन साखरपुडा! लंडन ते वैजापूर 1 'व्हिडिओ कॉल'वर जुळले दोन जीव! | VIDEO

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

SBI Recruitment: तयारीला लागा! स्टेट बँकेत ३५०० पदांसाठी भरती निघणार; समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT