Nana Patole targeted CM eknath shinde saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News: दाढीवाल्या बाबाचा कार्यक्रम होईल असं दिसतंय, नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

Nana Patole targeted CM eknath shinde and dcm devendra fadnavis : काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त कल्याणमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते.

साम टिव्ही ब्युरो

>>कल्याण अभिजीत, साम टीव्ही

Nana Patole Kalyan News: दाढीवाल्या बाबाचं काय चाललंय मला माहित नाही. त्यांचा कार्यक्रम होईल असं दिसतंय असा टोला काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते म्हणाले, आधी एक जाहिरात आणि सर्व्हे आला, त्यात महाराष्ट्रत दाढीवाल्या बाबाला पसंती असल्याचं दाखवलं गेलं. त्यानतंर पुन्हा दुसरी जाहिरात आली, त्यात नागपूरचा खूप मी पुन्हा येईल असं जोरात जोरात बोलणारा माणूस एक नंबरवर आला.

आठ दिवसातच हा बदल झाला. दाढीवाल्या बाबाचा कार्यक्रम ठरलेला आहे, हे कालच्या जाहिरातीमधून स्पष्ट होतं असा टोला नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लगावला. काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त कल्याणमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, कल्याण डोंबिवली दोन लोक महत्त्वाचे आहेत, एक मुख्यमंत्री आहे दुसरा मंत्री आहे. या दोघांचं असं आहे की आम्ही लोकांना विकत घेऊन टाकतो. कोणीही किती मोठा मेळावा घेऊदे आम्ही निवडणुकीच्या वेळेला लोकांना विकत घेऊ असे बोलल्याचे ऐकायला मिळतात असा टोला नाना पाठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लगावला.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात 19 ठिकाणी जाती आणि धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे महाराष्ट्राला त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होतोय का? ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या ठिकाणी गेलो तेव्हा या दंगली मुद्दाम घडवल्या जात असल्याचे समजले. भाजप जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरला. म्हणून या पद्धतीच्या कुरघोड्या करून पुन्हा एकदा निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ते यशस्वी होणार नाहीत, असंही नाना पाटोले म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला ऑपरेशन लोटस या गुवाहाटीच्या घडामोडी बाबत मुलाखत दिली. याबाबत बोलताना नाना पटोले यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष केलं. ऑपरेशन लोटस हे पुण्याचं काम आहे असं भाजप वाले समजतात. दुसऱ्याचं घर उध्वस्त करणं यात ते आनंद मानतात. (Latest Political News)

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाबद्दलची भूमिका मांडली. ती भूमिका भाजपने समजून घेतली तर त्यांना कळेल त्यांनी किती मोठं पाप केलंय. पण भाजप याला पुण्य समजत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही. अन्यायाच्या विरोधात आणि लोकशाही व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्याचं काम करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे नाना पटोले म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT