Nana Patole on CM Shinde  SAAM TV
महाराष्ट्र

Nana Patole : मोदी आणि शाहांमुळं मुख्यमंत्री शिंदेंचं १० किलो वजन कमी झालं, नाना पटोलेंचा टोला

Nana Patole : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तणावामुळे आपलं १० किलो वजन कमी झाल्याचे म्हटले होते. त्यावर पटोले यांनी त्यांना टोला लगावला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Nana Patole : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तणावामुळे आपलं १० किलो वजन कमी झाल्याचे म्हटले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदेंना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत. पूर्वी शिंदेंना टेन्शन नव्हतं. शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं वजन वाढत होतं.

पटोले म्हणाले की, शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं की ते मोदी आणि शाह यांचे हस्तक आहेत. आता देशाचं टेन्शनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. अमित शहा आणि मोदी यांच्या टेन्शनमुळेच एकनाथ शिंदे यांचं वजन कमी झालं हेच त्यांनी सांगितलं, असा खोचक टोला पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

सरकार पडण्याची शक्यता - पटोले

राज्यातील सरकार पडण्याची शक्यता देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. येत्या 14 15 आणि 16 तारखेला सुप्रीम कोर्टात राज्य सरकारबाबत सुनावणी होणार आहे. न्यायदेवता असंवैधानिक सरकारच्या विरोधात निर्णय देईल, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र पापातून मुक्त झाला - पटोले

नाना पटोले मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हणाले की, 12 आमदारांबाबत विविध क्षेत्रातील लोकांच्या नुकसानीला राज्यपाल आणि भाजप जबाबदार आहेत. बायस राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले होते. त्यांच्या माध्यमातून भाजपने महाराष्ट्राची बदनामी करून घेतली. (Maharashtra Political News)

या पापातून आता महाराष्ट्र मुक्त झाला आहे. माहितीच्या अधिकारात ही गोष्ट पुढे आली आहे की नवीन सरकार बनवण्याबाबत राज्यपालांनी कोणतेही निमंत्रण पत्र दिलं नव्हतं, असा दावा देखील नाना पटोले यांनी केला आहे.

हे असंवैधानिक सरकार - पटोले

पाच-पाच सहा-सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री आहे. दर आठवड्याला पालकमंत्र्यांनी त्याच्या जिल्ह्यात जाऊन आढावा घेणे हे गरजेचं असतं, तसे नियम आहेत. पण हे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही. हे सरकार असंवैधानिक सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष निवडीबाबतचा उल्लेख केला, अनेकदा राज्यपालांवर ताशेरे ओढले गेले. कोर्टाने राज्यपालांवर ताशेरे ओढणे हे मोठी गोष्ट आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT