Nagpur Mahapalilka
Nagpur Mahapalilka SaamTvNews
महाराष्ट्र

नागपुर शहरातील ३०१ स्वातंत्र्य सैनिकांच्या घरासमोर लावण्यात येणार नाम फलक

मंगेश मोहिते

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महापालिकेतर्फे शहरातील ३०१ स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहिती आणि आदर निर्माण व्हावा यासाठी त्यांचा घरापुढे नामफलक लावण्यात येत आहेत. नागपूर (Nagpur) महानगरपालिकेतर्फे 'प्रशासन स्वातंत्र्य सैनिकांच्या दारी' हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागपूर शहरातील तब्बल 301 स्वातंत्र्य सैनिकांचा घरी भेट देऊन घरासमोर नामफलक लावण्यात येत आहेत. या भेटी दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांनी (Freedom Fighters) दिलेल्या योगदानाबद्दल मनपा तर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील पहा :

या उपक्रमाला शहिद शंकरराव महाले यांच्या घरापासून सुरुवात करण्यात आली असून स्वातंत्र्य सैनिकांचा कुटुंबियांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शहिद शंकरराव महाले यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात इंग्रज सरकारच्या विरोधात भाग घेतला होता. त्यांचे वडील दाजीबाजी महाले यांना या आंदोलनात गोळी लागली होती. त्या विरोधात नागरिकांनी नवाबपुराच्या पोलीस चौकीमध्ये आग लावली होती. या आंदोलनाचे नेतृत्व शहिद शंकर महाले यांनी केले होते. त्याविरोधात इंग्रजांनी त्यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती.

मात्र, त्यावेळी शंकरराव केवळ १६ वर्षाचे होते. पुढे दोन वर्ष त्यांना कारागृहात ठेवून नंतर फाशी देण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनात देशात सर्वात कमी वयात शंकरराव महाले यांनी देशासाठी प्राण अर्पण केले. फाशीची शिक्षा होण्यापूर्वी आईची भेट झाली तेव्हा रडत असणाऱ्या आईची शंकररावांनी समजून काढताना सांगितले होते की, ‘मी तुमच्या पोटी पुन्हा जन्म घेईन.’ शंकरराव महाले यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधी सुद्धा होत्या, असे त्यांच्या परिवारातर्फे सांगण्यात आले. लाल किल्ल्यावर सुद्धा शंकर महाले यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

Accident In Hingoli : हिंगोलीत भरधाव कार झाडावर आदळली, महिलेसह दोघे ठार; बुलडाण्यातही एसटी-खासगी बसच्या धडकेत महिला ठार

SCROLL FOR NEXT