Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : विजेच्या झटक्याने कामगाराचा मृत्यू; नालासोपाऱ्यात बिल्डिंग दुरुस्ती दरम्यानची घटना

Nalasopara News : नालासोपारा पूर्व परिसरातील अपार्टमेंटच्या दुरुस्तीचे काम चालू होते. बिल्डिंगच्या टेरेसवर पत्र्याचे शेड बसवण्याचे काम करण्यात येत होते.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोडवरील साधना अपार्टमेंट या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम करत (Nalasopara) असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. (Breaking Marathi News)

नालासोपारा पूर्व परिसरातील अपार्टमेंटच्या दुरुस्तीचे काम चालू होते. बिल्डिंगच्या टेरेसवर पत्र्याचे शेड बसवण्याचे काम करण्यात येत होते. यासाठी लोखंडी पाईप बसवण्यात आले होते. दरम्यान आज शेडचे काम करत असताना लोखंडी पोल बाजूनेच गेलेल्या हायटेन्शन वायरच्या जवळ होता. (Electric Shock) या दरम्यान लोखंडी पाईपाच्या संपर्कात आल्याने एका कामगाराला विजेचा झटका लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर घटनेची माहिती तुळींज पोलिसांना (Police) मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवला. बिल्डिंगचे दुरुस्ती काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Varvarche Vadhu Var: लग्नाआधी एकदा पाहाचं ! लग्नावरचं हलकं फुलकं, प्रभावी नाटक - 'वरवरचे वधू वर'

Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

GK: रडताना डोळ्यांतून अश्रू का बाहेर पडतात? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT