Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case: जामीन देण्यासाठी मागितली १ लाखाची लाच; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

जामीन देण्यासाठी मागितली १ लाखाची लाच; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

चेतन इंगळे

नालासोपारा : एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी १ लाखांची लाच (Bribe) मागणाऱ्या तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल (Nalasopara) करण्यात आला आहे. रामचंद्र शेंडगे असे या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला. (Latest Marathi News)

फिर्यादी यांचा केटरिंग आणि मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांच्या विरोधात तुळींज (Police) पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेंडगे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी शेंडगे यांनी एक लाखांची लाच मागितली होती. प्रत्येक प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावेच लागतात, असेही शेंडगे यांनी सांगितल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी तक्रारदाराने ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शेंडगे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. परंतु त्यांना सापळा लावून रंगेहाथ पकडण्यात अपयश आले. त्यामुळे मंगळवारी रात्री शेंडगे यांच्यावर एक लाख रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT