Trimbakeshwar News: हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात शुद्धीकरण; महाराष्‍ट्र बंदची हाक

त्र्यंबकेश्वर मंदिरात शुद्धीकरण; हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्‍ट्र बंदची हाक
Trimbakeshwar News
Trimbakeshwar NewsSaam tv

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : अन्य धर्मीय जमावाकडून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण आता चांगलेचं तापले आहे. यात हिंदुत्ववादी संघटना आणि ब्राह्मण महासंघाकडून आज मंदिर परिसराचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक झाली नाही; तर शुक्रवारी (Maharashtra) महाराष्ट्र बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आली. (Breaking Marathi News)

Trimbakeshwar News
Accident News: दुचाकी– कारची धडक; अपघातात २ ठार, १ जखमी

एका जमावाकडून त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. १३ मेस गुलाब शहावली बाबांचा गावातून ऊरुस निघाल्यानंतर एका जमावाने मंदिरात धूप दाखवण्यासाठी घुसण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत मंदिर परिसराचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. त्यानंतर साधू महंतांनी देखील शुद्धीकरण मंत्र मंदिर परिसराचे शुद्धीकरण करून घडल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. अशी कोणतीही परंपरा त्र्यंबकेश्वर असल्याचा दावा देखील करण्यात आला.

Trimbakeshwar News
Nandurbar News: कंटेनरमधून ४६ लाखांची अवैध दारू जप्त; गुजरातकडे जात असताना पोलिसांची कारवाई

शुक्रवारी महाराष्‍ट्र बंदची हाक

शनिवारी घडलेल्या या प्रकारानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत हिंदू शिवाय अन्य कुणालाही मंदिरात प्रवेश नाही. या आशयाचा फलक असलेल्या ठिकाणचे अतिक्रमण देखील हटवले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने काही काळ मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना त्वरित अटक न झाल्यास येत्या शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली. तर दुसरीकडे ७२ तासात आरोपींवर कारवाई न झाल्यास राज्यातील सर्व मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला.

Trimbakeshwar News
Pandharpur News: विठ्ठल दर्शनासाठी व्‍हीआयपी शुल्‍क; वारकरी सांप्रदायाने केली मागणी

दर्ग्यातील आयोजक म्‍हणतात..दरवर्षीची परंपरा

हे सगळं प्रकरण ज्या गुलाब शहावली बाबांच्या उरूसामधील धूप मंदिरासमोर दाखवण्यावरून सुरू झालं. त्या दर्ग्यातील आयोजकांनी ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा असल्याचं म्हटलंय. आम्ही दरवर्षी ही प्रथा करतो. दरवाजाच्या बाहेरून धूप दाखवली जाते; आम्ही कुणीही मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला नाही असं म्हटलंय.

या सगळ्या प्रकरणी आता मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी देखील सुरू करण्यात आली. मात्र आता हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना त्वरित अटक करण्याची भूमिका घेतल्याने हे प्रकरण अधिक तापण्याची चिन्हं आहेत. मात्र या प्रकरणी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेत राज्यातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही; याची देखील काळजी घेण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com