महाराष्ट्र

Vasai Crime: बदलापूरनंतर नालासोपारा हादरलं; ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, दोन दिवसांनी गुन्हा दाखल

Vasai Crime: बदलापूरनंतर वसईतील नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना घडलीय. सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीय. दरम्यान पोलिसांचा निष्काळजीपणा देखील समोर आलाय.

Bharat Jadhav

बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच वसईत एक धक्कादायक घटना घडलीय. नालासोपाऱ्यात ७ वर्षीय मुलीचा विनयभंग, तसेच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आलीय. विशेष म्हणजे तक्रार करण्यासाठी ११२ वर संपर्क साधला असता, कोणत्याच प्रकरची मदत मिळाली नाही. पीडितेच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये जा असं सागंण्यात आला होतं. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतांनाच पोलिसांचा निष्काळाजीपणा समोर आलाय.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांचा ढिसाळ कारभार समोर आलाय. हाती आलेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यात एका सात वर्षाच्या मुलीचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. ही घटना दोन दिवसापूर्वी घडली, मात्र पोलिसांनी दोन दिवसानंतर गुन्हा दाखल केल्याची बाब समोर आल्यानं पोलीस यंत्रणेवर प्रश्न निर्माण होत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस मदतीसाठी ११२ वर फोन केला असता,पोलीस ठाण्यात जा असे उत्तर देण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केलाय.

पोलीस ठाण्यात गेले असता गुन्हा दाखल करू नका, असे सांगण्यात आलं. तुम्हाला त्रास होईल, मुलीला इथे तिथे तपासासाठी घेऊन जावे लागेल, असं पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराला सांगितल्याचं माहिती संबंधित व्यक्तींनी दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.३० वाजता विनयभंगाची घटना घडली. त्यानंतर बुधवारी रात्री १ वाजता विनयभंग,पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यात महिला सुरक्षे प्रश्न ऐरणीवर असतांना पोलिसांनी या गंभीर प्रकरणी दोन दिवसानंतर गुन्हा दाखल का केला? त्यामुळे तुलिंज पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात तुलिज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश नगरकर यांच्याशी या घटनेबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यांनी कोणतीच माहिती दिली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kulith Usal Recipe: मोड आलेल्या कुळीथाची उसळ कशी बनवावी? जाणून घ्या झटपट सोपी रेसिपी

Pune News : वो दोस्त ही क्या! दारू पिण्यावरून दोस्तीत कुस्ती, मित्राने जिवाभावाच्या दोस्ताला संपवलं, त्यानंतर...

Maharashtra Live News Update : तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन आक्रमक

नांदेडच्या लॉजमध्ये आढळला शिक्षकाचा मृतदेह; हत्या ती आत्महत्या? नक्की घडलं काय?

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीची तारखी ठरली, उद्धव ठाकरे-राहुल गांधींमध्ये चर्चा; दिल्लीमध्ये राजकारण तापणार

SCROLL FOR NEXT