झोपेत असणाऱ्या पती-पत्नीवर अज्ञात इसमाकडून घरात घुसून प्राणघातक हल्ला!
झोपेत असणाऱ्या पती-पत्नीवर अज्ञात इसमाकडून घरात घुसून प्राणघातक हल्ला!  चेतन इंगळे
महाराष्ट्र

झोपेत असणाऱ्या पती-पत्नीवर अज्ञात इसमाकडून घरात घुसून प्राणघातक हल्ला!

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : नालासोपारा परिसरात एका अज्ञात इसमाने घरात घुसून पती पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तुळींज पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री नालासोपारा (Nalasopara) पूर्व संतोष भुवन परिसरात राहणाऱ्या अमित मिश्रा आणि त्याची पत्नी ज्योती घरात झोपले असता एका अज्ञात इसमाने घरात घुसून प्राणघातक हल्ला (Attack) चढविला.

हे देखील पहा :

यात पती पत्नी (Husband and Wife) जखमी झाले असून पत्नीची स्थिती नाजूक आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात माहिती देताना तुळींज (Tulinj) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस (police) निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी माहिती दिली की, आशिष आणि ज्योती हे मूळचे उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) असून आठ महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे.

संतोष भुवन बावशेत पाडा येथे ते आठ दिवसापूर्वीच राहायला आले होते. शनिवारी ते दोघेही झोपले असता घराचा दरवाजा तोडून एक इसम घरात घुसला आणि त्याने दोघांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केला. यात दोघेही जखमी झाले. असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीची स्थिती नाजूक आहे. शेजाऱ्यांनी आरोपीला घरातून पळून जाताना पाहिले आहे. त्यावरून पोलिसांना आरोपीची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT