kolhapur, nakusa bodke, nakusha bodke saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : चिठ्ठी लिहून मुलीची काेल्हापूरात आत्महत्या; Sex साठी युवकाचा आग्रह, पाेलिस तपास सुरु

या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजित माजगावकर

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील (kolhapur latest news) बोंद्रे नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली. नकुशा बोडके (nakusha bodke) असं मुलीचे नाव आहे. नकुशाने युवकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत लिहिलं आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

कोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात नकुशा बोडेकर ही राहत होती. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती परिसरातील घर कामे करून कुटुंबाला हातभार लावत होती. चार दिवसांपूर्वीच ती नातेवाईकांच्या बोंद्रेनगर इथल्या घरी आली होती.

काल दुपारी घरी कोणीही नसताना तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने कागदावर लाल शाहीने दोन चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये तिने युवकाचे नाव लिहून ताे आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असे शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचा केला आहे.

या घटनेनंतर संशयित युवकाने पळ काढला आहे. पोलीस संशयिताला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशी माहिती अरविंद काळे (पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे) यांनी दिली.

तर घटना टळली असती

दरम्यान संशयित तरुण या तरुणीला त्रास देत असल्याची माहिती या तरुणीने आपल्या कुटुंबीयांना किंवा समाजातील इतर नागरिकांना दिलेली नव्हती. जर याची तक्रार तिने समाजाकडे केली असती तर आपण वेळेतच त्या तरुणाला समज दिली असती. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला असता अशी प्रतिक्रिया मल्हार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष बबन रानगे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

युवकांच्या प्रबाेधनाची गरज

संशयिताला त्वरित अटक करावी आणि त्याला कठोर शिक्षक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेली आहे. यापूर्वी देखील या परिसरातील धनगर समाजातील एका मुलीने एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे आता पोलीस आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी तरुणांचे प्रबोधन करून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

Black Salt vs Regular Salt : काळं मीठ की साधं मीठ? हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कोणते मीठ खावे?

Maharashtra News Live Update: राज्यात दुष्काळाने शेतकरी बेहाल, मंत्रालयात कोट्यावधींची उधळपट्टी

Deep Depression Storm : बंगालच्या उपसागरात 'डीप डिप्रेशनची' तीव्रता वाढली, 'या' राज्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

Navel oil therapy: २१ दिवस बेंबीत तेल लावल्यास काय होईल? जाणून घ्या मोहरी, नारळ, बदाम तेलाचे फायदे

SCROLL FOR NEXT