Malshiras Saam
महाराष्ट्र

Crime News : नग्न करून गरम सळईचे चटके, तरूणाचा तडफडून मृत्यू; अनैतिक संबंधातून हत्या

Love Affair Murder Suspicion: तरूणाचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह. अंगावर गरम सळईचे चटके. अनैतिक संबंधातून तरूणाचा मृत्यू झाल्याचा संशय.

Bhagyashree Kamble

माळशिरस तालुक्यातील पिलीव रोडवर एका तरूणाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मृतदेहावर गरम लोखंडी सळईचे चटके आहेत. तसेच त्याच्या शेजारी दुचाकी आढळली आहे. हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरणातून किंवा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

आकाश अंकुश खुर्द-पाटील (वय वर्ष २८) असं मृत तरूणाचं नाव आहे. तरूणाचा मृतदेह माळशिरस पिलीव हद्दीत असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये निवस्त्र आढळला. त्याच्या शरीरावर गरम लोखंडी सळईचे चटके होते. तसेच गंभीर जखमा होत्या. तरूणाच्या मृतदेहाच्या शेजारी त्याची मोटारसायकल आढळली.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल आला नसून, यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. दरम्यान, पंचनामा करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस तपासात हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून एक तरूणी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी माळशिरस पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT