Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

Malegaon News : मालेगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; अकरा जुगारी ताब्यात, ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

nashik Malegaon News : करजगव्हाण रोड पिपळ्या लवण शिवार परिसरात मालेगाव पोलिसांनी कारवाई केली. जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मालेगाव (नाशिक)
: मालेगावमध्ये चालविण्यात येत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ११ जुगाऱ्यांना तिरट जुगार खेळताना रंगेहात पकडलं आहे. मात्र दोघेजण याठिकाणाहून फरार झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी या ठिकाणावरून तब्बल ३ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल रोख रक्कम, मोटारसायकली आणि जुगार साहित्य जप्त केले आहे.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील करजगव्हाण रोड पिपळ्या लवण शिवार परिसरात मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली. यावेळी येथे १२ ते १३ जण जुगार खेळात असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहून त्यांनी येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. 

अकरा जणांना घेतले ताब्यात 

मात्र पोलिसांनी या धडक कारवाईत तब्बल ११ जुगाऱ्यांना तिरट जुगार खेळताना रंगेहात पकडलं आहे. पकडलेल्यांमध्ये विठ्ठल बिरारी, अमोल माळी, रामसिंग गुंजाळ, समाधान बिरारी, रमेश राठोड, मच्छिंद्र खैरणार, तानाजी चव्हाण, आबा मोरे, भिकन पवार, प्रविण गायकवाड आणि रावण सोनवणे या अकरा इसमांचा समावेश आहे. मात्र भास्कर चौधरी आणि गणेश सांगवा हे दोन इसम फरार होण्यात यशस्वी झाले. 

३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान पोलिसांनी या ठिकाणावरून तब्बल ३ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम, मोटारसायकली आणि जुगार साहित्य पंचा समक्ष जप्त केले आहे. तर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सदरची कारवाई मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुण्यात

Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धन धन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

Tuesday Horoscope : आनंदी आनंद होणार, आयुष्यात सुंदर घटना घडतील; ५ राशींच्या लोकांचे नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT