Nagpur: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवित
Nagpur: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवित संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवित

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं. या निकालानं काँग्रेसला Congress एकप्रकारे बुस्ट मिळालं आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आगामी नागपूर Nagpur महापालिका निवडणुकीत Election याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

हे देखील पहा -

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळं नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. या पोटनिवडणुकीत 16 जिल्हा परिषदेच्या जागेपैकी 9 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. तर पंचायत समितीच्या 31 जागांपैकी 21 जागा काँग्रेसनं जिंकल्या. या निकालामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आलंय. जिल्हा परिषदेत मिळालेलं यश महापालिकेतही मिळू शकतं. त्यामुळं कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र, ग्रामीण आणि शहरी भागातील समस्या, प्रश्न वेगळे असतात. त्यामुळं महापालिकेत त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

महाविकास आघाडी सरकारच्या  स्थापनेनंतर ही पोटनिवडणुक झाली. ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर या पोटनिवडणुका घेण्यात आल्यानं ओबीसींचा मुद्दा केंद्रस्थानी होता. त्यामुळं या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मतं टाकतात याकडे लक्ष लागलं होतं. मतदारांनी कॉंग्रेस च्या बाजूनं कौल दिल्यानं काँग्रेसच्या आशा पल्लवित होणं साहजिक आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT